पुण्यात दिवसाला वाजतात दीड कोटी हॉर्न

आरटीओ, पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आली माहिती

पुणे – विनाकारण हॉर्न वाजवत ध्वनी प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनचालकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहर आणि जिल्ह्यात 12 सप्टेंबर हा दिवस “नो हॉर्न डे’ म्हणून पाळला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात दररोज दीड कोटी वेळा हॉर्न वाजवले जातात, अशी माहिती पुढे आली आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या नेतृत्त्वाखाली आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत व विनोद सगरे यांच्या संकल्पनेतून पुणे शहर आणि जिल्ह्यात “नो हॉर्न डे’ पाळला जाणार आहे. या मोहिमेत आरटीओ अधिकारी, पुणे शहर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे पदाधिकारी यशवंत कुंभार, नीलेश गांगुर्डे, निखिल बोराडे, विविध ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. या मोहिमेला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फेही सहकार्य केले जाणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

शहर आणि वाहने


38 लाख- पुणे
पिंपरी-चिंचवड-18 लाख
बारामती – 4 लाख

जिल्ह्यात सुमारे 60 लाख वाहने दररोज धावतात. यातील निम्मी वाहने शहरात दिवसभरात आली, तरी प्रत्येक वाहन पाच-सहा वेळा हॉर्न वाजवते. त्यामुळे दिवसभरात सुमारे दीड कोटी हॉर्न वाजतात, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी “प्रभात’ला सांगितले.

ड्रायव्हिंग स्कूल वर्षभर चालवणार उपक्रम
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांची संख्या 49 लाख इतकी आहे. यातील 75 टक्के वाहने रोज धावतात. शिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांची संख्याही जास्त आहे. विशेषत: ऑफिस वेळेत रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. यामुळे एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. पुढे जाता येत नसल्याने मोठ-मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. गरज नसताना ध्वनी प्रदूषण केले जाते. शाळा, हॉस्पिटल, सरकारी कार्यालये, न्यायालय अशा शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविण्यावर बंदी असतानाही सर्रासपणे शांततेचा भंग केला जातो. हा उपक्रम संपूर्ण राज्यातील सर्व 51 परिवहन कार्यालये, ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणार असल्याचे राजू घाटोळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)