पुण्यात दिड एकराच्या जागेचे मालक हरवले

चांदणी चौक उड्डाणपूल ; एकतर्फी भूसंपादन करण्याचा निर्णय

पुणे  : पुणे शहराच्या आसपास एक गुंठे जागेसाठी तीस ते पस्तीस लाख रुपये मोजावे लागत असतानाच; चांदणी चौकाच्या परिसरातील तब्बल दिड एकर जागेचे मालक हरवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या जागा मालकांचा शोध घेण्यासाठी महापालिकेकडून वारंवार जाहीर निवेदन देऊनही हे सहा ते सात जागा मालक सापडत नसल्याने त्यांची जागा एकतर्फी पंचनामा करून ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय)ला दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी सुमारए 13.99 हेक्‍टर जागा लागणार असून पालिकेने अत्ता पर्यंता 80 टक्के जागेचे भूसंपदान केले आहे. ही जागा एनएचआयला हस्तांतरीत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उर्वरीत जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात पालिकेस सर्व जागा मालकांची माहीती तसेच सातबारे मिळालेले असले तरी, जवळपास दिड एकर जागेचे मालक अद्यापही पालिकेस मिळालेले नाहीत. त्यामुळे पालिकेने जाहीर निवेदन दिले. शेजारील जागा मालकांकडे चौकशी केली. वेगवेगळया मार्गांनी त्यांचे पत्तेही मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर अद्यापही कोणीच या जागेसाठी पुढे आलेले नाही.

त्यामुळे या जागेचे एकतर्फी भूसंपादन करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी सांगितले. ही जागेचा मोबदला घेण्यासाठी पुढे कोणीच न आल्याने या पूलाचे भूसंपदान रखडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पंचनामा करून ही जागा ताब्यात घेऊन, महापालिकेकडे जागा मालक आल्यानंतर त्यांना महापालिकेकडून मोबदला दिला जाईल असेही उगले यांनी स्पष्ट केले.

डीच हेक्‍टर कमीच जागा लागणार 
या पूलासाठी करण्यात आलेल्या प्रकल्प आरखडयात एनएचआयने पालिकेकडे 13.99 हेक्‍टर जागेची मागणी केली होती. मात्र, आता प्रत्यक्षात महापालिका आणि एनएचआयने पूलाच्या कामासाठी केलेल्या संयुक्त आखणीत साडे अकरा हेक्‍टरच जागेची आवश्‍यकता लागत असल्याचे उगले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेस त्यांच्या मागणीपेक्षा दोन ते अडीच हेक्‍टरे कमी जागा लागणार असल्याचे उगले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
5 :heart:
3 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)