पुण्यात दहा वर्षांतील नीचांकी तापमान : 5.9 नोंद

अनेक भागांतील तापमान दहा अंशांच्या खाली

पुणे – उत्तरेकडील राज्यांमध्ये असणारी थंडीची लाट महाराष्ट्रात येऊन पोहोचली असून अनेक भागांतील तापमान दहा अंशांच्या खाली आले आहे. पुण्यातही मागील दहा वर्षातील सर्वांत कमी म्हणजे 5.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 1.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, तेथे दाट धुक्‍क्‍यांमुळे 25 मीटरपेक्षा अधिक अंतरावरील स्पष्ट दिसणेही शक्‍य होत नाही. उत्तरेकडील थंडी महाराष्ट्राकडे येऊ लागली आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात किमान तापमानात घट होत आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या तापमानात सरासरीपेक्षा 1 ते 4 अंशांची, नाशिकमध्ये 6.4 अंश सेल्सिअस, तर जळगाव, मालेगाव येथे 9 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रात मात्र तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोकणातही तापमानात 1 ते 5 अंशांची घसरण झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथेही तापमानात सरासरीपेक्षा तब्बल 5 अंशांची घट झाल्याने थंडी वाढली.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून गारठा वाढला आहे. नागरीक दिवसा सुद्धा स्वेटर व शाल परिधान करून फिरताना दिसून येत आहेत. रात्रीच्या तापमानात सुद्धा कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेकोट्या पेटल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)