पुण्यात एका व्यक्तीला दिसला एलियन ?

पुणे – पुण्यातील एका व्यक्तीने एलियन दिसल्याचा दावा केला असून तसा ई-मेलच त्याने पंतप्रधान कार्यालयाला पाठविला आहे. पीएमओच्या या मेलने पुणे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यासंबंधीत पुणे पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने आपल्या घराबाहेर एलियन दिसल्याचा दावा केला. व थेट पीएम कार्यालयाला ईमेल करत चौकशी करण्याची मागणी केली.  पीएमओने महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहीत या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले आहे. यानुसार महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंहगड रस्त्यावरील पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध लावला आहे. हा ४७ वर्षीय व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचे काही वर्षांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाले होते. तेव्हापासून त्याचे मानसिक संतुलन ढासळले. काही महिन्यांपूर्वी त्याने आपल्या घराबाहेर झाडांची सावली बघितली. तेव्हा त्याला एलियनसारखे दिसले आणि एलियन पृथ्वीबाबत महत्वपूर्ण माहिती आपल्या ग्रहावर पाठवत असल्याचा भास झाला. आणि त्याने थेट पीएमओला ईमेल करत तपासाची मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)