पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक 

पुणे – रेल्वे हद्दीत उभारलेले अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा सांगाडा कापत असताना तो सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर कोसळून २ ठार, ९ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे.

एक धोकादायक होर्डिंग पाडण्याचे काम रेल्वेने ठेकदाराला दिले. याची कोणतीही माहिती महापालिका तसेच वाहतूक विभागाला देण्यात आली नाही. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काम सुरू करण्यात आले होते. यावेळी होर्डिंग दोरीने मागच्या बाजूला दगड व लोखंडी वजनाला बांधण्यात आले होते. तर दुसरीकडे गॅस कटरच्या सहाय्याने होर्डिंग थेट खालूनच कापण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी वाहतूक सुरुच होती.  होर्डिंगला आधार देणारे अँगलच कापल्याने ही दुर्घटना घडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)