पुण्यातील हृदयरोग तज्ञाचा अपघातात मृत्यू

चालकाचा ताबा सुटल्याने कार पलटी, अन्य चार डॉक्‍टरही गंभीर
भुईंज प्रतिनिधी दि 18
चालकाचा ताबा सुटल्याने कार दुभाजकाला धडकून पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य तीघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघातात वेळे (ता. वाई) गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला. डॉ. युवराज विलास घाटोळे असे अपघातातील मृताचे नाव आहे. घाटोळे हे नामवंत हृदयरोगतज्ञ आहेत. तसेच अपघातातील सर्वजणच डॉक्‍टर आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)