पुण्यातील बहुतांशी शाळांचा निकाल शंभर टक्‍के

पुणे,दि.26 – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुण्यातील बहुतांशी शाळांचे निकाल दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही शंभर टक्‍के लागले आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नव्वदच्या पुढे गुण मिळवले आहेत. पुण्यातील नामांकित शाळांमधील चुरस यंदाही अटीतटीची असल्याचे यंदाच्या निकालावरुन समोर येते आहे.
पुण्यातील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमधील श्रृती भागवत या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेत 95.40 टक्‍के गुण मिळवले आहेत. तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील उत्कर्ष सिंघानिया 97.2 टक्‍के मिळवत वाणिज्य विषयात शाळेत पहिले येण्याचा मान पटकावला आहे. तसेच रायन शब्बीर खान या विद्यार्थ्याने 97 टक्‍के गुण ह्यमॅनिटीज या शाखेत मिळवले आहेत आणि सृष्टी निशिथ या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून 96.2 टक्‍के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलमधील आयुषी कश्‍यप या विद्यार्थिनीने 92.8 टक्‍के गुण विज्ञान शाखेतून मिळवले आहेत. या शाळेतील जुईली पटवर्धन या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेतून 95 टक्‍के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्‍के लागला असून या शाळेची बारावीची ही पहिलीच बॅच होती. किरकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला आहे.
कॅम्पमधील आर्मी पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला असून पुर्वा मोघेकर या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून प्रथम येत 95.4 टक्‍के गुण मिळवले आहेत. संस्कृती स्कूलचाही निकाल शंभर टक्‍के लागला असून आदर्श निंगाणूर हा विद्यार्थी 94 टक्‍के गुण विज्ञान शाखेतून मिळवत प्रथम आला आहे. तसेच डीएव्ही पब्लिक स्कूलचा निकालही शंभर टक्‍के लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)