पुण्यातील पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

चिमुकलीला मृत्युच्या दाढेतून काढले बाहेर

पुणे – रस्ते अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत होवून निकामी झालेल्या कवटीचे यशस्वी प्रत्यारोपण करून चार वर्षांच्या चिमुकलीला पुण्यातील डॉक्‍टरांनी मृत्युच्या दाढेतून बाहेर काढले. भारतातील ही पहिली कवटी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉक्‍टरांनी केला असून, भारती हॉस्पिटलमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

-Ads-

कोथरूड परिसरात हे कुटुंबिय राहणारे आहेत. दरम्यान, मार्च 2017 मध्ये वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात मुलीच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली होती. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती जगेल के नाही अशी परिस्थिती असताना, डॉक्‍टरांनी सर्व यंत्रणा कामाला लावून प्रथमता सिटी स्कॅन केले. त्यावेळी मेंदुच्या आजुबाजूची 60 टक्के कवटी पूर्णपणे निकामी झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दीड वर्षांपूर्वी कठीण सर्जरी केल्यानंतर तिला घरी पाठविण्यात आले होते. मात्र, तिच्या डोक्‍याच्या वेगळ्या आकारामुळे सर्वसामान्य मुलींमध्ये ती मिसळत नव्हती. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी डॉक्‍टरांची भेट घेऊन मुलीची व्यथा सांगितल्यावर डॉक्‍टरांनी कवटीचे प्रत्यारोपण करण्यासाठी तिला पुन्हा रुग्णालयात बोलवण्यात आले.

कवटीचे हाड जेव्हा काढले जाते तेव्हा ते रेफ्रिजरेट करून, सूज उतरल्यावर पुन्हा बसवले जाते. परंतु तिचे वय लहान होते आणि तिचे कवटीचे हाड ठिसूळ होते, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणे शक्‍य नव्हते. शस्त्रक्रियेनंतर ती लहान मुलगी उपचारांना चांगला प्रतिसाद देऊ लागली आणि तिची प्रकृतीही सुधारायला लागली. चार वर्षांच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये आणल्यापासून तिची काळजी घेणारे डॉ. जितेंद्र ओसवाल, उपवैद्यकीय संचालक आणि बालरोगतज्ज्ञाची प्राध्यापक व पेडिएट्रिक आयसीयू (पीआयसीयू)च्या प्रमुख डॉ. भक्ती सारंगी यांनी तिच्यासाठी योग्य उपाय शोधण्याचा निर्धार केला होता. सीसीआय उपचार पद्धतीची केलेली घोषणा एक आशेचा किरण ठरली आणि संपूर्ण हॉस्पिटल या लहानगीच्या मदतीसाठी सरसावले.

अमेरिकेतून मागविली खास कृत्रिम कवटी
प्रत्यारोपण करताना मुलीच्या मेंदुला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली. न्यूरोसर्जन्सनी तिच्या मेंदूजवळची निकामी हाडं अलगदपणे काढून टाकली. ही हाडं काढताना तिला कुठेही जखम होऊ दिली नाही. पण डोक्‍यासाठी नवीन कवटी बसवणं गरजेचं होतं. त्यामुळे अमेरिकेतून खास एक कृत्रिम कवटी मागवण्यात आली. त्यासाठी अमेरिकेमधील डिवाईस कंपनीच्या आर ऍण्ड डी टीमने रुग्णाच्या डोक्‍याच्या स्कॅन इमेजेसचे परीक्षण केले. सखोल अवलोकन व तपासणीनंतर मुलीच्या कवटीच्या भागाला अनुरुप अशी रोपणाची रचना करण्यात आली. त्यानुसार कवटीच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया दोन टप्प्यात घेण्याचे डॉक्‍टरांच्या टीमने ठरविले. त्यानुसार कवटीच्या हाडांचे डी मॉडेलला जोडण्यात डॉक्‍टरांच्या टीमला यश आले. सध्या त्या मुलीची प्रकृती चांगली असून, ती सर्वसामान्य आयुष्य जगत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)