पुण्यातील पदाधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती

पुणे – महापालिका पदाधिकाऱ्यांसह महापौर बदलाचा सध्या कोणताही विचार नाही. पुण्यातील सर्व पदाधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खासदार दानवे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुण्यातील आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर दानवे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे विशेषतः महपौर बदलाच्या चर्चांना तुर्तास पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. विशेषतः महापौर मुक्‍ता टिळक यांच्या ठिकाणी अन्य कोणाची वर्णी लागते, याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याचीदेखील चर्चा होती. मात्र, आता खुद्द प्रदेशाध्यक्षांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना दानवे म्हणाले, “पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे कामकाज आणि जबाबदारी यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्यात आली. त्यात सर्वच पदाधिकाऱ्यांचे काम समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा कोणताही विचार सध्या नाही,’ असेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. पुण्यातील पदाधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, अशीही प्रशस्ती दानवे यांनी दिल्याने आता स्थानिक पदाधिकाऱ्यांना हुरूप चढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)