#व्हिडीओ : पुण्यातील टिळक रस्त्यावरील इमारतीला भीषण आग

पुणे – टिळक रस्त्यावरील एका इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटला सकाळी नऊच्या सुमारास मोठी अाग लागली. या अागीत फ्लॅट पूर्ण जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीने भीषन रुप धारण केल्याने तब्बल सव्वातास सलग पाण्याचा मारा करुन आग अटोक्यात आणल्याचे फायर ब्रिगेडकडून सांगण्यात आले. दरम्यान, या अागीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

-Ads-

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अाज सकाळी 9.13 च्या सुमारास टिळक राेडवरील अपार्टमेंटला अाग लागल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन फायरगाड्या आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पाण्याचा मारा करुन काही वेळात ही अाग अाटाेक्यात अाणण्यात अाली. यानंतर सध्या कुलिंग करण्यात येत अाहे. या अागीत तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

फ्लॅटमधील स्टोरेजरुममध्ये शाॅटसर्किटमुळे अाग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत अाहे. यानंतर इतरत्र ही आग पसरली. ज्या फ्लॅटला अाग लागली हाेती त्या फ्लॅटच्या खालच्या मजल्यावर बॅंकांची कार्यालये अाहेत. अग्निशमन दलाकडून तातडीने आग अटोक्यात आल्याने मोठा धोका टळला. स्टेशन ड्युटी आँफिसर प्रदीप सोनवणे, दिपक कचरे, मनीष बोंबले, फायरमन जाधव, माळी यांनी अाग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)