#video: पुण्यात होर्डिंग कोसळून चार जणांचा मृत्यू, नऊ जखमी

पुणे – पुण्यातील जुना बाजार येथील अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग कोसळून नऊ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी असून त्यातील तीन जण अत्यवस्थ असल्याचे समजत आहे. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

-Ads-

अमर शेख चौकातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एका ठेकेदाराला (नाव समजू शकलेले नाही) सांगण्यात आले होते. हे होर्डिंग काढत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळले. यामध्ये पाच रिक्षांचा समावेश आहे. दरम्यान, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून होर्डिंग हटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे शिवाजीनगरकडून जाणारी वाहतूक न्यायालयीन परिसरातून वळवली असल्याने डेंगळे पूल आणि कुंभारवाडा चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

दरम्यान, कोसळलेले होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत असल्याने त्या घटनेशी पालिकेचा काहीही संबंध नसल्याचे म्हणत महापालिकेने हात वर केले आहेत. तर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
59 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
60 :cry: Sad
28 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)