पुण्यातही मुसळधार पावसाची शक्‍यता

पुणे -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात सध्या पाऊस पडत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार आहे. पुण्यात सुद्धा आगामी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. परतीचा मान्सून लवकरच तो महाराष्ट्रातून बाहेर पडेल. त्यामुळे आगामी काळात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची संततधार सुरू आहे. कोकण किनारपट्टीवर ढगांचे आवरण निर्माण झाल्याने कमी दाबाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस पडत आहे. पुण्यातसुद्धा गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पाऊस पडेल, असे वाटत होते. पण, काही भागात रिमझिम सरी झाल्या.

सध्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे बाष्प गोळा होऊन त्याचे पावसात रुपांतर होत आहे. महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीसाठी अनूकुल स्थिती निर्माण झाली असून येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रातून सुद्धा बाहेर पडेल, अशी शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)