पुण्याच्या संपन्न शेलारचा 9 तास समुद्रात पोहण्याचा विक्रम

दुहेरी पद्धतीने पोहून बंगाल खाडी पार करणारा जगातील पहिला जलतरणपटू

पुणे : पुण्याच्या संपन्न रमेश शेलार या 17 वर्षीय जलतरणपटूने बंगाल खाडीचे अंतर दुहेरी पद्धतीने पोहून पार केले. अशा प्रकारे पोहणारा संपन्न हा जगातील एकमेव जलतरणपटू आहे. संपन्नने बांग्लादेश येथील समुद्रामध्ये सेंट मार्टीन्स आयलॅंड ते टेकनॅफ जेट्टी आणि परत सेंट मार्टिन्स आयलॅंड हे 32.2 किलोमीटरचे सागरी अंतर 9 तास 10 मिनीटामध्ये यशस्वीरीत्या पार केले. त्याने ही कामगिरी दि. 30 मार्च रोजी केली, अशी माहिती त्याचे मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनीस यांनी दिली.

यावेळी प्रशिक्षक हर्षद इनामदार, संपन्न शेलार, रमेश शेलार, शारदा शेलार आदी उपस्थित होते. बांग्लादेशच्या मुसा इब्राहिम यांच्या एव्हरेस्ट ऍकेडमी यांनी या मोहिमेचे आयोजन केले होते. संपन्नने 30 मार्च रोजी सेंट मार्टीन्स आयलॅंडच्या किनाऱ्यावरून सकाळी 5 वाजून 40 मिनिटाने पोहायला सुरुवात केली.

आपल्या प्रवासाविषयी माहीती देताना संपन्न म्हणाला, पहिल्या तासामध्ये 5 किलोमीटर अंतर पार केले. परंतु, पुढच्या तासामध्ये वारा अनुकूल नसल्याने माझा वेग मंदावला. टेकनॅफ बंदरापर्यंतचे 16.1 किलोमीटर अंतर मी 3.45 मिनिटात पोहणे अपेक्षित होते. परंतु, वाऱ्याचा वेग ताशी 25 किमी असा वाढल्याने मला पहिला टप्पा म्हणजे 16. 1 किमी अंतर पार करण्याकरीता 5 तास लागले. बरोबर 10 वाजून 40 मिनिटाने मी निम्मे अंतर पार केले. 10 मिनिटे विश्रांती घेऊन 10 वाजून 50 मिनिटांनी परत पोहायला सुरुवात केली.

जितेंद्र खासनीस म्हणाले, परतीच्या प्रवासात वाऱ्याचा फायदा घेत संपन्नने 16.1 किलोमीटर अंतर बरोबर 4 तासात पार केले. परतीच्यावेळी वाऱ्याचा जोर वाढला होता. मात्र, पाण्याखालील वातावरण अनुकूल होते. 2 वाजून 50 मिनिटानी त्याने मोहीम पूर्ण करीत पाय टेकवले. सेंट मार्टीन्स आयलॅंड पोहताना संपन्नने नारळपाणी, चॉकलेट, केळी असा आहार घेतला. दरम्यान, पोहताना त्याला खाऱ्या पाण्याचा आणि उन्हाचा त्रास झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)