पुण्याच्या रेश्‍मा पुणेकर हिची भारतीय संघात निवड

  • हॉंगकॉंग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल आशियायी कप स्पर्धेसाठी निवड

पुणे – हॉंगकॉंग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल आशियाई स्पर्धेसाठी बारामती येथील शारदा महिला महाविद्यालयातील रेश्‍मा शिवाजी पुणेकर हिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. रेश्‍मा ही मुळची बारामती तालुक्‍याच्या तरडोली येथील ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहे. तिच्या निवडीने पुण्यासह बारामती तालुक्‍याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बारामती तालुक्‍यातील तरडोली गावात कुठल्याही सुविधा नसताना रेश्‍मा पुणेकर हिने लोणी भापकर येथील न्यू इंग्लीश स्कूलमधून बेसबॉल खेळण्याची सुरूवात केली. रेश्‍मा पुणेकर हिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 4 सुवर्ण, 3 रौप्य तर 4 कांस्यपद पटकविली आहेत. सध्या रेश्‍मा बारामती येथे पुढील शिक्षण घेत असून महिला बेसबॉलसंघात तिची भारतीय संघातून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी रेश्‍माला 1 लाख 40 हजार रूपयांची आवश्‍यकता असून विविध स्तरांवरून मदतीचा ओघ सुरू असून तिला आणखी मदतीची आवश्‍यक असून दानशुरांनी पुढे यावे, असे आव्हान तिने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)