पुण्याच्या प्रवाशाच्या मोटारीची जेऊरमधून चोरी

नगर – पुण्याच्या प्रवाशाची मोटारीची चोरी जेऊर (ता. नगर) शिवारातील हॉटेल राधाईसमोरून झाली आहे. शशांत खागे (रा. गणेशपेठ, पुणे) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

शशांत हे हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी चोरांनी या मोटारीची चोरी केली. शशांत बाहेर आल्यावर त्यांना मोटार तिथे आढळली नाही. आजूबाजूला चौकशी केल्यावर त्यांना मोटार चोरी झाल्याचे लक्षात आले.

एमआयडीसी पोलिसांकडे त्यांनी तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी चोरीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून त्यानुसार तपास सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)