पुण्याच्या प्रलंबित प्रश्‍नाबाबत मंत्रालयात बैठक

बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, खंडपीठ आदी मागण्यांवर होणार चर्चा

पुणे – बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुणे शहरातील इतर प्रमुख प्रश्‍नांसाठी येत्या 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी, यासाठी पालकमंत्री बापट यांनी 17 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशी बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशावरून बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ही बैठक 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यातील मेट्रो प्रकल्प व चांदणी चौक येथील उड्डाणपूल हे दोन्ही प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने जमीन संपादित करून बीडीपीबाबत निर्णय घेणे, चांदणी चौक येथील उड्डाणपुलाबाबत चर्चा करणे, पुणे शहरामध्ये 40 टक्के झोपड्या आहेत, या निर्मूलनाच्या कामांमध्ये गती आणणे, मेट्रोसाठी बालेवाडी येथील शासकीय जागा तत्काळ हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेणे, पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करणे, पिंपरी-चिंचवड येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्या कमतरतेबाबत आढावा घेणे, पुरंदर येथील विमानतळासाठी भूसंपादनाबाबत चर्चा करणे, भामा-आसखेड पुनर्वसनाबाबत निर्णय घेणे याबाबत चर्चा करण्यासाठी बापट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते.

विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिक्षक अभियंता, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत, अशी माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)