पुण्याच्या पाण्याचा शासनाला विसर

महापालिकेकडून 1,350 एमएलडी पाणी वापर सुरू : आयुक्त

पुणे – कालवा समितीच्या बैठकीला 4 दिवस झाले असले, तरी शासनाकडून अद्याप महापालिकेस नेमके किती पाणी खडकवासला धरणातून दिले जाणार हे कळविण्यात आले नाही. पालिकेच्या मागणीनुसार शहराला प्रतीदिन 1,350 एमएलडी पाणी देण्याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांनी कलावा समितीच्या बैठकीत दिले होते.

-Ads-

ऑक्‍टोबर महिन्याच्या बैठकीत पालिकेस 1,150 एमएलडी प्रतीदिन पाणी मंजूर केले होते. त्यामुळे महापालिकेने शहरात ऐन दिवाळीत एकवेळ पाणी कपात सुरू केली होती. मात्र, हे पाणी शहरासाठी कमी पडत असल्याने पुन्हा 1,350 एमएलडी पाणी वापरण्यास सुरुवात करण्यात आली. ही बाब चुकीची असल्याचे सांगत, मागील आठवड्यात पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठ्याचे पंप अचानक बंद केले होते. सुमारे साडेसहा तास पालिकेने विनवनी केल्यानंतर पाटबंधारे विभागाने हे पंप सुरू केले.

मात्र, वारंवार पालिका आणि पाटबंधारे विभागात होणारा हा वाद सोडविण्यासाठी सोमवारी (दि. 26 नोव्हेंबर) मुंबईत तातडीची कालवा सल्लागार समितीची बैठक बोलाविण्यात आली. यात महापालिका पदाधिकारी तसेच, शहरातील आमदारांकडून महापालिकेच्या पाण्यात कोणतीही कपात न करता शहरासाठी दररोज आवश्‍यक असलेले 1,350 एमएलडी पाणी मिळावे, अशी मागणी केली. बैठकीत कोणताही निर्णय न घेता जलसंपदामंत्र्यांनी पुण्याच्या पाण्याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय कळविला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. या बैठकीला 4 दिवस झाले असले तरी, पालिकेस अद्याप याबाबत काहीच सूचना नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या बैठकीनंतर पालिकेचे पाणी कापणाऱ्या पाटबंधारे विभागाकडून “तुमचं आमचं सोडा’ अशी भूमिका घेत, प्रतीदिन 1,250 एमएलडी पाणी घ्यावे, अशी विनंती केली आहे. मात्र, ते शक्‍य नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

1,350 वापर कायम
बैठकीनंतर महापालिकेस शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेकडून अद्याप 1,350 एमएलडी पाणी वापर प्रतिदिन सुरू असल्याचेही ते म्हणाले. तसेच शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील असेही राव म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)