पुण्याच्या ‘औद्योगिक’ प्रदूषणात वाढ

संग्रहित छायाचित्र.......

28 कंपन्यांना “एक स्टार’, तर 36 कंपन्यांना दोन स्टार

पुणे – शहरातील कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी “स्टार रेटिंग’ हा विशेष पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. यानुसार पुण्यातील 28 कंपन्या या सर्वाधिक, तर 36 कंपन्या या “प्रदूषणकारी’ या पातळीवर असल्याचे समोर आले आहे. एकूणच पुण्याच्या औद्योगिक प्रदूषणात वाढ होत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण मोजणीसाठी स्टार रेटिंग हा “रिअल ताइम मॉनिटरिंग’ सिस्टमवर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कंपन्यांना त्यांच्या प्रदूषणकारी कामगिरीच्या आधारावर “रेटिंग’ म्हणजेच मानांकन दिले जाते. यामध्ये सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या कंपनीला “एक स्टार’, तर सर्वांत कमी प्रदूषक असलेल्या कंपनीला “पाच स्टार’ असे मानांकन दिले जाते. या उपक्रमांतर्गत 253 कंपन्यांनी नोंदणी केली आहे. उपक्रमाच्या नव्याने प्रकाशित झालेल्या पाहणीनुसार 28 कंपन्यांना “एक स्टार’ मानांकन मिळाले आहे, तर 36 कंपन्यांना दोन स्टार असे मानांकन मिळाले आहे. या कंपन्यांमध्ये सिमेंट, केमिकल, मेटल वर्क, पेपर, फार्मास्युटिकल, कापड, साखर आणि वीज या क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश होतो. कंपन्यांमधील वाढते प्रदूषणाचे प्रमाण हे अत्यंत चिंताजनक असल्याचे यामुळे स्पष्ट होते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाच्या मुल्यांकनांसाठी सर्व कंपन्यांना विशेषत: सिमेंट, केमिकल, मेटल वर्क, पेपर, फार्मास्युटिकल, कापड, साखर आणि वीज या क्षेत्रांमधील कंपन्यांना ज्या सर्वाधिक प्रदूषक कंपन्या मानल्या जातात. त्यांनी रिअल टाइम मॉनिटरिंग (सीइइएमएस) यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. या यंत्रणेमुळे कंपन्यांमधील प्रदूषणाच्या तत्काळ नोंदी घेणे शक्‍य झाल्याने, त्यासंदर्भातील कंपन्यांवर त्वरित कारवाईदेखील करता येते. याच आधारावर कंपन्यांना “स्टार रेटिंग’ देण्यात येते.

स्टार रेटिंग उपक्रमामध्ये 82 नवीन कंपन्यांचा समावेश
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाबाबत उपयुक्त असणाऱ्या “स्टार रेटिंग’ या उपक्रमात राज्यातील 82 नवीन कंपन्यांची नोंद करण्यात आली आहे. उपक्रमासाठी ही एक अतिशय चांगली बाब असून, हा उपक्रम अधिक सक्षमतेने राबवत औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण कमी ठेवण्यास मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा “स्टार रेटिंग’च्या टीमकडून व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)