पुण्याचे बाळकृष्ण भंडारीयांना सेवेन्थ डॅन ब्लॅक बेल्ट

पुणे: दक्षिण कोरीयामधील कुक्कीऑन, वर्ल्ड तायक्वांदो हेडक्वार्टर्स येथे झालेल्या परिक्षेत यश मिळवित पुण्याचे बाळकृष्ण भंडारी हे सेवेन्थ डॅन ब्लॅक बेल्टचे मानकरी ठरले आहेत. संपूर्ण भारतात केवळ 15 तायक्वांदोपटू सेवेन्थ डॅन ब्लॅक बेल्ट असून, परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे भंडारी हे देशातील 16 वे सेवेन्थ डॅन ब्लॅक बेल्ट तायक्वांदोपटू ठरले आहेत. यापूर्वी कोरीया येथील चोसन युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर ही पदवी मिळवून तायक्वांदोच्या जागतिक क्रमवारीत त्यांनी 19 वे स्थान प्राप्त केले होते.

जगभरातील 21 देशातील 120 तायक्वांदोपटूपैकी पहिल्या 4 मध्ये बेस्ट परफॉर्मर म्हणून त्यांची निवड करण्यात आली. वर्ल्ड तायक्वांदो तर्फे आयोजित स्पर्धेत त्यांनी हे यश मिळविले आहे. सेंट मिराजच्या प्राचार्य डॉ. गुलशन गिडवाणी, सिस्टर तारा, गुरुबंस कौर, सुवर्णा पाठक-देवळणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाळकृष्ण भंडारी हे मागील 20 वर्षापासून सेंट मिराज कॉलेजमध्ये विद्यार्थीनींना तायक्वांदोचे प्रशिक्षण देतात. बाळकृष्ण भंडारी यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविले आहेत. ते राष्ट्रीय पुमसे जज असून, दक्षिण कोरीया येथे त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. महाराष्ट्र शासनाकडून तायक्वांदो मधील कामगिरीसाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धू क्षेत्री यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये विक्रम केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)