पुण्याचे पाणी कमी होणार नाही : किरण गित्ते 

पुणे : पुण्याचे पाणी कमी होणार नाही अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. गित्ते म्हणाले, प्राधिकरणाने तीन टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. पश्‍चिम भागातील 12 लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात येत आहे. यातील 75 टक्के निधी खासगी संस्थांकडून उभारला जाणार आहे.

तर पूर्व भागातील वाघोली मधील 3 ते 4 लाख नागरिकांना इंद्रायणी आणि भीमा नदीतून पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेतून होणारी पाण्याची बचत आणि आरक्षण यातून पाणी उपलब्ध होईल. पुण्याचे पाणी कमी होणार नसल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)