पुण्याचे पाणी कमी होणार नाही

मुख्यमंत्र्यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आश्‍वासन

पुणे – कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेच्या पाण्यात करण्यात आलेली कपात जलसंपदामंत्र्यांशी बोलून रद्द केली जाईल. पुणे शहराला कोणत्याही स्थितीत पाणी कमी पडून दिले जाणार नाही असे स्पष्ट करत शहरातील पाणीकपातीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला आहे.

गुरूवारी पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना महापौर मुक्ता टिळक यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी पाणीप्रश्‍नी तोडगा काढण्याचे साकडे घातले. यावेळी आपण स्वत: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी यांच्याशी चर्चा करून पूर्वीप्रमाणे पाणी देण्याच्या सूचना देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या माहितीस महापौर मुक्ता टिळक यांनी दुजोरा दिला.

कालवा समिती बैठकीत शहराला 1,350 ऐवजी 1,150 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पाटबंधारे विभागाने खडकवासला धरणावर जात पाणी पुरवठ्याचे पंप पोलीस बंदोबस्तात बंद केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यानंतरही जादा पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने नकार दिल्याने महापालिकेने अखेर पाणीकपातीचा निर्णय घेतला. त्यातच विस्कळीत पाणी पुरवठ्याचे पडसाद मुख्यसभेतही उमटत असून भाजप नगरसेवकच पाण्यासाठी आंदोलने करत आहेत. त्यामुळे भाजपचीही चांगलीच कोंडी झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूर येथे महापौर परिषदेसाठी गेलेल्या मुक्ता टिळक यांनी ही बाब थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावर पुण्यातील पाणी-बाणीची दखल थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेत आयुक्तांकडूनही पाण्याच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.

त्यानंतर गुरूवारी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा महापालिका प्रशासन तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी पाण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद पुणेकरांना आहे तेवढेच पाणी मिळेल कालवा समितीत निर्णय घेतालेली पाणी कपात रद्द करून शहराला प्रत्येक दिवसासाठी आवश्‍यक असलेले पाणी दिले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुणेकरांची पाणी कपातीमधून सुटका होण्याची शक्‍यता असून शहराला मोठा दिलासा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)