पुणे : 71 हजार नावे मतदार यादीत फोटोविना

संग्रहित छायाचित्र

26 हजार दुबार नावे


मतदार नोंदणी कार्यालयाकडून विशेष मोहिम हाती

विश्रांतवाडी- वडगावशेरी मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 4 लाख 19 हजार 856 इतकी आहे. यापैकी मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या तब्बल 71 हजार 707 इतकी असून 26 हजार दुबार नावे आहेत. जिल्ह्यातील 21 मतदार संघापैकी वडगावशेरी मतदारसंघात मतदार यादीत फोटो नसलेल्यांचे व दुबार नावांचे सर्वाधिक प्रमाण आहे. मतदारांचे फोटो गोळा करण्याकामी वडगावशेरी मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयाने विशेष मोहिम हाती घेतली आहे.

मतदारांनी मतदारयादीत आपला फोटो आहे का, हे तपासून पहा अन्यथा मतदार यादीतून आपले नाव रद्द होण्याची शक्‍यता आहे. याबाबत मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिलेली माहिती अशी, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत 10 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द झालेल्या यादीनुसार वडगावशेरी मतदारसंघात 404 यादी भाग असून 61 केंद्रात विखुरलेले आहेत.

-Ads-

एकूण मतदार 4 लाख 19 हजार 856 इतके आहेत. यामध्ये पुरूष मतदार 2 लाख 20 हजार 8 तर स्त्री मतदार 2 लाख 1 हजार 141 इतके आहेत. तर तृतीपयपंथी 10 मतदार आहेत. गेल्या वर्षभरापासून घेण्यात आलेल्या साधारणपणे दहा मोहिमेतंर्गत महाविद्यालय, शाळा, राजकीय बैठकामध्ये यादीतील फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो जमा करणे, मयत/दुबार स्थलांतरीत मतदारांचे नाव वगळणे याबाबत वारंवार आवाहन करूनही त्याला मतदारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सध्या मतदार यादीतील फोटो नसलेल्या मतदारांची संख्या 71 हजार 707 इतकी आहे. त्यामध्ये पुरूष 37 हजार 583 तर स्त्री 34 हजार 124 इतकी असून त्याचे प्रमाण 17.79 इतके आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघापैकी वडगावशेरी मतदारसंघात हे सर्वाधिक प्रमाण आहे. याचबरोबर याच मतदारसंघात 26 हजार इतकी दुबार नावे आहेत. सदरच्या मतदारांचे फोटो गोळा करण्याकामी 31 मेंपर्यंत विशेष मोहिम हाती घेतली असून त्या मोहिमेतंर्गत मतदारांनी एक फोटो, रहिवाशी पुरावा, फोटो ओळखपत्रासह मतदार नोंदणी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत प्रसिध्दी होण्यासाठी जागोजागी फ्लेक्‍स लावण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर फोटो नसलेल्या मतदारांची यादी ही प्रसिध्द करण्यात येणार आहे. मोहिमेच्या कालावधीत मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा करणेसाठी लोकप्रतिनिधींना ही यादी कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिली जाईल. बीएलओमार्फत याबाबत घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत.

वडगावशेरी मतदारसंघातील मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची संख्या व दुबार नावे, अशीच राहिल्यास मतदार यादी केवळ फुगून दिसणार आहे. मतदानांची टक्‍केवारी देखील कमी होणार आहे. दुबार नावे आहेत. त्यांना नोटीसा देखील देण्यात येणार असून त्यांची नावे देखील कमी करण्यात येणार असल्याचे ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले. 31 मेपर्यंत ही मोहिम असून नागरिकांनी मतदार यादीत आपला फोटो आहे का, ते तपासून पहावे; अन्यथा वेळेत फोटो व पुरावा उपलब्ध करून न दिल्यास मतदारयादीतील नाव कमी होईल व मतदानांचा हक्‍क देखील बजावता येणार नसल्याचे मोळक यांनी सांगितले.

यावेळी तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव, नायब तहसिलदार शुभांगी जाधव उपस्थित होत्या. यापुढील मतदारयादीत नाव नोंदणी करणाऱ्यांचे मतदार कार्ड रंगीत येणार आहे. त्यावरील छायाचित्र सुध्दा रंगीत येवून स्मार्ट कार्डसारखे मतदार कार्ड दिले जाणार आहे. जुने ज्यांचे कृष्णधवल मतदार कार्ड आहे. त्यांनी जुने जमा करून रंगीत मतदार कार्डसाठी येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील मतदार नोंदणी कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन देखील वडगावशेरी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी केले आहे. वडगावेशरी मतदार संघात वयोमानानुसार जर मतदारांचा विचार केला तर सर्वाधिक तरूण मतदारांची संख्या अधिक आहे.

वयोगट व मतदार पुढीलप्रमाणे, 18 ते 19 – 3681, 20 ते 29-57016, 30 ते 39-114770, 40 ते 49-106968, 50 ते 59-67369, 60 ते 69- 40879, 70 ते 79-20966, 80 च्या पुढे -9515.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)