पुणे : 50 वाहने घसरली ; झाडपडीच्या ४ घटना

पुणे- दिवसभर ढगाळ वातावरणानंतर रविवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहने घसरून पडण्याचे प्रकारही घडले. शहरातील एक महत्वाचा आणि वर्दळीचा रस्ता असणाऱ्या जंगली महाराज रस्त्यावर अर्धा तासाच्या कालावधीत सुमारे 50 वाहने घसरून पडली. यामुळे काही नागरिकांना किरकोळ जखमाही झाल्या.

शहरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण होते. अशातच रविवारी सायंकाळी काही काळ पावसाचा शिडकाव झाला. आधीच काही ठिकाणी रस्त्यावर वाहनाचे तेल सांडले होते. यावेळी पावसामुळे ओलसर झालेले रस्ते, त्यातच रस्त्यावरील तेल यामुळे अनेक वाहने घसरून पडली. जंगली महाराज रस्ता येथे अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन माती टाकली. मात्र, पुन्हा पावसाचा शिडकाव झाल्याने माती ओली झाली. त्यामुळे तो रस्ता अधिकच निसरडा झाला. यामुळे एकापाठोपाठ एक अशा अनेक दुचाकी गाड्या घसरल्या. यामध्ये काही जणांना किरकोळ जखमादेखील झाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहनचालकांना सावध करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे पोलिसांकडून बॅरिकेटस्‌ लावण्यात आले होते. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ मंदावली होती. मात्र तरीही गाड्या घसरण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यावेळी रॉबिनहूड आर्मी’चे कार्यकर्ते आणि काही तरूण यांनी उस्फूर्तपणे पुढे येऊन लोकांना सावध करण्याचे काम केले. “रस्ता निसरडा असल्यामुळे वाहने सावकाश गाड्या चालवा’, असे वारंवार सांगण्यात येत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)