पुणे – 47 वाहन चालकांवर गुन्हे दाखल

पुणे – भरधाव वाहने चालवत सुरक्षा धोक्‍यात आणणाऱ्या 47 जणांविरोधात वाहतूक विभागाने शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील अपघात टाळण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून रॉंग साईड, अल्पवयीन, ट्रीपल सिट अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी एकाच दिवशी 47 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भादंविच्या कलम 279 अर्थात भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविण्याच्या प्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघात होतात. अशा प्रकरणांत 6 महिने कैद व एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेंची तरतूद आहे. यामुळे चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)