पुणे: 32 वर्षांपासूनच्या दस्तांसाठी “ई-सर्च’ प्रणाली

कार्यालयात जाण्याची गरज नाही
नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना अधिकाधिक सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यात अग्रेसर आहे. यात विभागाने नागरिकांसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या नवीन “ई-सर्च’मुळे आता जुने दस्त शोधण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही. तसेच, संबंधित मालमत्तेचा मालक कोण आहे, हे समजण्यास मदत होणार आहे.

आता घरबसल्या शोधा मालमत्तेचा मालक!

पुणे -जमीन, सदनिका अथवा दुकाने यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारला आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने “ई-सर्च’ ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये 2002 पासून ते आतापर्यंत नोंदविलेले सर्व दस्त ऑनलाइन उपलब्ध केले आहेत. यासोबतच आता नोंदणी विभागाने 1985 सालापासूनचे दस्त उपलब्ध करून देण्याचे काम आता हाती घेतले आहे. यामुळे नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर मागील 32 वर्षांपासून दस्त उपलब्ध होणार आहे.

येथे पाहता येईल माहिती
मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहाराचे जुने दस्त ऑनलाइन पाहण्याची सुविधा नोंदणी व मुद्रांक्र विभागाच्या www.igr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

-Ads-

नवीन प्रणाली कशासाठी?
एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामध्ये खरेदीदाराची आर्थिक फसवणूक होते. तसेच, एक सदनिका अनेक बॅंकेत गहाण ठेवून त्याआधारे कर्ज घेतल्याचे प्रकारही घडतात. असे प्रकार टाळण्यासाठी नोंदणी विभागाने ई-सर्च ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात 500 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यामध्ये दररोज साधारण 8 हजार दस्तांची नोंदणी होते. एकाच जागेची किंवा सदनिकांची विक्री अनेकांना विकण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे संबंधित मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे, याची माहिती खरेदीदाराला समजावी, यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरत आहे.

2002 पासूनचे दस्त उपलब्ध
कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असते. पूर्वी असे बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयास भेट देऊन शोध घेणे गरजेचे होते. सामायिक कार्यक्षेत्रात एकापेक्षा अधिक कार्यालये असतात. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी त्रास होत असे. या सर्व बाबींचा विचार “ई-सर्च’च्या माध्यमातून 2002 पासूनचे दस्त उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ई-सर्च या सुविधेचा वापर करून शोधलेल्या दस्ताची अथवा दस्तांच्या सूचीची (इंडेक्‍स) प्रत डाऊनलोडही करता येते. आता याच्या पुढील टप्प्यात 1985 सालापासूनचे दस्त ई-सर्चमध्ये उपलब्ध करून देण्याचा नोंदणी विभागाचा प्रयत्न आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांतील 1985 ते आजपर्यंतचे दस्त ई-सर्चमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. यानंतर 1985 ते 2002 या वर्षातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमधील दस्त स्कॅनिंग करून ते ई-सर्च प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.  अनिल कवडे, नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक

ई-सर्चचे फायदे
– घरबसल्या मालमत्तेचा मालक कोण, हे समजणार
– संबंधित दस्ताची प्रतही डाऊनलोड करून घेण्याची सुविधा
– दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही.
– नागरिकांची फसवणूक टळणार

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)