पुणे – 27 हजार फुकट्यांवर रेल्वेची कारवाई

– 3 कोटींचा दंड वसूल : अवघ्या 2 महिन्यांतील कारवाई

पुणे – फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेने राबविलेल्या मोहिमेमध्ये 62 हजार 528 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन महिन्यांत 3 कोटी 27 लाख 73 हजार रु. दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये 27 हजार 737 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचादेखील समावेश आहे. ही कारवाई एप्रिल आणि मे 2018 या दोन महिन्यांत करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वेमधून फुकट प्रवास करणे किंवा प्लॅटफॉर्म तिकीट न घेता फिरणे, सेकंड क्‍लासचे तिकीट काढून फर्स्ट क्‍लासच्या डब्यातून प्रवास करणे अशा विविध कारणांसाठी रेल्वे प्रशासानकडून प्रवाशांवर कारवाई केली जाते. गेल्या दोन महिन्यात केलेल्या कारवाईत 62 हजार 528 जणांना पकडून त्यांच्याकडून 3 कोटी 27 लाख 73 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी 27 हजार 737 जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून 1 कोटी 71 लाख 8 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या काही दिवसांत रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल बुडून पर्यायाने रेल्वेला तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे ही कारवाई सुरू आहे.

ही मोहीम पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूरदरम्यान करण्यात आली. पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त मंडळ रेल्वे व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यापुढील काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्यारा प्रवाशांवर कारवाई करुन वेळप्रसंगी त्यांना कारावास भोगावा लागू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)