पुणे : 2 लाख 49 हजार रुपयांची घरफोडी

पुणे – वारजे येथे 2 लाख 49 हजार रुपयांची घरफोडी करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बबन चोभे (50, रा. श्रीराम सोसायटी) हे राहाती सदनिका बंद करून बाहेर गेले होते. यावेळी मुख्य दरवाजाचे कुलूप चकटून चोरट्याने आत प्रवेश केला. यानंतर बेडरुममधील कपाटातील रोख व सोन्याचे दागिने असा 2 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए.व्ही.कदम तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)