पुणे : 14 ठिकाणी उभारणार ई-टॉयलेट

संग्रहित छायाचित्र

खासदार निधीतून 2 कोटींच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता

पुणे – शहरातील प्रमुख झोपडपट्टयांमध्ये सुमारे 14 ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा आणि सोयी सुविधा असलेली ई-टॉयलेट (स्वच्छतागृह) उभारण्याच्या 2 कोटींच्या खर्चास मंगळवारी स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून ही टॉयलेट उभारली जाणार आहेत. त्यात दोन सीट्‌स असलेली महिलांसाठीची 12 स्वच्छतागृहे असतील असून प्रत्येकी 1 सीट असलेली दोन स्वच्छतागृहे महिलांसाठी उभारली जाणार आहे.

या प्रस्तावानुसार, दोन सीटस्‌च्या स्वच्छतागृहांचा खर्च 18 लाख 42 हजार रुपये, तर एका सीट्‌सचा खर्च 12 लाख 32 हजार रुपये असणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी यावेळी दिली. नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या स्वच्छतागृहासाठी शहरातील वेगवेगळ्या भागातील झोपडपट्टयांची निवड करण्यात आल्याने त्याच्या वापराबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

दरम्यान, शहरातील कोणत्याही नागरिकांना 50 पैशांपासून ते 10 रुपयांचा कॉइन वापरून हे स्वच्छतागृह वापरता येणार आहे. तसेच जीपीआरएस आणि जीपीएस प्रणालीने हे स्वच्छतागृह सुसज्ज असणार असून मोबाइल ऍप वरही या स्वच्छतागृहांचे लोकेशन असणार आहे. याशिवाय, अत्याधुनिक फ्लश तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने त्याच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र व्यक्तीची आवश्‍यकता नसल्याचे यावेळी शिरोळे यांनी सांगितले.

येथे उभारणार स्वच्छतागृह
भैरोबा नाला, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, मावळे आळी, दांडेकर पूल, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, मॉडेल कॉलनी, तुकाई नगर, हिरवाई गार्डन या परिसरात ही स्वच्छतागृहे असणार आहेत.

…तर ई- टॉयलेट ठरणार “पांढरा हत्ती’ 

खासदार निधीतून ही स्वच्छतागृहे उभारली जाणार असली तरी, भविष्यात ती महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरण्याची शक्‍यता आहे. ही स्वच्छतागृहे उभारल्यानंतर पहिल्या वर्षाची देखभाल दुरूस्ती स्वच्छतागृहे पुरविणारी कंपनीच करणार आहे. त्यानंतर मात्र, महापालिकेस या स्वच्छतागृहांच्या देखभाल दुरूस्तीसाठी दरमहा तब्बल 1 लाख 48 हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. यातील 2 सीट्‌सच्या स्वच्छतागृहासाठी महिन्याला 11 हजार रु., तर एक सीटच्या स्वच्छतागृहासाठी महिन्याला 8 हजार रु. खर्च असणार आहे. म्हणजेच, या स्वच्छतागृहासाठी दरवर्षी 17 लाख 76 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
38 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)