पुणे: 13 कोटी वृक्ष लागवडीसाठी शासनाची जय्यत तयारी

पुणे – राज्यात लवकरच वनमहोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवांतर्गत 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष गाठण्यासाठी शासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. वनविभागाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार असून, स्थानिक रहिवासी, स्वयंसेवी संस्था यांनीदेखील या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यसरकार आणि वनविभाग यांच्यातर्फे केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून विभागातर्फे नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांच्यासाठी सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या रोपांचा समावेश असलेले स्टॉल्स गुरूवारपासून (ता.28) विभागाच्या प्रांगणात लावली जाणार आहेत.

वनमहोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक, शैक्षणिक संस्था अशा विविध स्तरातील लोकांनी सहभागी होण्यासाठी पसंती दर्शविली आहे. या नागरिकांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार रोपे उपलब्ध व्हावीत, यासाठी वन विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत विभागातर्फे विविध प्रकारची रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पती, फळझाडे, फुल झाडे, औषधी वनस्पती यांचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात या रोपांचा समावेश असलेले स्टॉल्स वनविभागाच्या सेनापती बापट येथील कार्यालयात लावण्यात येणार आहे. यामाध्यमातून नागरिकांना त्यांच्या पसंतीचे रोपे निवडून, त्याद्वारे वृक्षारोपणामध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. ही रोपे सवलतीच्या दरात घेता येणार आहे, असे विभागातर्फे महेश भावसार यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)