पुणे होणार ‘सिलेंडर मुक्त’

file pic

दीड वर्षांत प्रत्येक घरात पीएनजीद्वारेच गॅस पुरवठा

पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीमार्फत (एमएनजीएल) घरांमध्ये थेट पाईप लाईनद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा करण्यात येत आहे. शहरात 12 लाख घरे असताना आतापर्यंत फक्त 1 लाख 40 हजार घरांपर्यंत पाईप लाईनद्वारे गॅस पोहोचला आहे. त्यामुळे दीड वर्षांत शहरातील प्रत्येक घरात पीएनजीद्वारेच गॅस पुरवठा करण्याचे उदिष्ट असून दीड वर्षांत शहर सिलेंडर मुक्त करण्याचा निर्धार एमएनजीएलने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील 1 लाख 40 हजारपेक्षा अधिक घरांना स्वयंपाकासाठी आणि हॉटेल, उपहारगृहे, धर्मादाय संस्था आदींसारख्या 300 व्यावसायिक आस्थापना आणि 163 उद्योगांना पीएनजीद्वारे गॅस पुरविण्यात येतो. शहरात पसरलेल्या 220 किमी स्टील पाईपलाईन आणि 1200 किमी एमडीपीई (मीडीयम डेन्सिटी पॉलिइथिलीन) पाईपलाईनच्या जाळ्यांचा समावेश आहे. शहरातील हडपसर, विमाननगर, कोथरुड, मॉडेल कॉलनी, एरंडवणे, बाणेर, पाषाण, सहकारनगर, कोंढवा, एनआयबीएम रस्ता, उंड्री, पिसोळी आदी भागांमध्ये पीएनजी गॅस आधीच उपलब्ध झाला आहे.

या टप्प्यानंतर महंमदवाडी, वानवडी, धायरी, स्वारगेट, मांजरी, रावेत, पुनावळे आदी नविन भागांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून 2018-19 या आर्थिक वर्षात आणखी 1 लाख घरांना पीएनजी जोडणी पुरवण्याची योजना एमएनजीएलने आखली आहे.

पाईप्ड नॅचरल गॅसचे विशेष गुण
– सुरक्षित
– स्वयंपाकाचा स्वस्त पर्याय
– 24 बाय 7 निरंतर पुरवठा
– पुन्हा भरून घेणे, नोंदविणे, वाट पाहाणे, सिलेंडर बसविणे यापासून सुटका
– अनुदानित एलपीजीपेक्षा स्वस्त
– दर दोन महिन्यांनी बिल भरावे लागते

खोदाईसाठीची समस्या सुटणार
महानगरपालिकेडून खोदाईसाठी लवकर परवानगी मिळण्यास उशीर होत असल्याचा दावा एमएनजीएलकडून करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेत नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून खोदाईसाठीची समस्या आता राहणार नाही. फक्त वाहतूक पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरात 12 लाख घरे आहेत. यातील 8 ते 9 लाख घरांपर्यंत नक्‍कीच पीएनजी गॅस पोहोचू शकतो. प्रत्येक घरांपर्यंत गॅस पोहोचण्यास उशीर होतो. याचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिकेकडून परवानगीसाठी दिरंगाई होते. प्रत्येक घरात पीएनजी गॅस पोहोचला तर स्वच्छ व हरित पुणे होऊ शकते.

– संतोष सोनटक्के, वाणिज्य संचालक, एमएनजीएल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)