पुणे होणार “ई-कनेक्‍ट सिटी’

अत्याधुनिक बस थांबे, स्मार्ट टॉयलेट आणि कचरापेट्याही
पुणे – स्मार्ट सिटी अंतर्गत पुणेकरांना लवकचर स्मार्ट सुविधाही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून संपूर्ण शहरात ई-कॅरिडोर उभारले जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

पीपीपी तत्वावर हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात उभारण्यात आलेल्या स्मार्ट इलिमेंट प्रकल्पाचा हा दुसरा टप्पा असणार असून पीपीपी तत्वावर उभारला जाणार असून यातील या प्रकल्पातून मिळणारे उत्पन्न स्मार्ट सिटी, महापालिका आणि पीएमपीलाही मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अंतर्गत 199 ठिकाणी मोफत वायफाय आणि स्मार्ट डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. त्याचा वापर शहरातील वाहतूक समस्या सोडविणे तसेच एकाच वेळी शहरातील सर्व नागरिकांना आवश्‍यक असलेली माहिती तत्काळ देण्यासाठी होणार आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यात संपूर्ण शहर वाय-फाय करण्यासाठी आणखी स्मार्ट इलिमेंट उभारली जाणार आहेत. त्यात 1 हजार स्मार्ट बस स्थानके उभारली जाणार असून त्यावर वाय-फायसह इतर अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. या शिवाय 500 स्मार्ट टॉयलेट असून त्या ठिकाणीही वाय-फाय असणार आहे.

तसेच सौर उर्जेवर चालणारे 2 हजार पथदिवे उभारले जाणर आहेत. या शिवाय, शहरात सुमारे 500 ठिकाणी स्मार्ट कचरा पेट्या बसविण्यात येणार असून या त्या कचऱ्याने भरल्यानंतर वाय-फाय द्वारे संदेश देणाऱ्या असणार आहेत. तसेच 100 हून अधिक नागरी सुविधा केंद्र उभारली जाणार असून त्या ठिकाणी मोफत वायफाय सह शासनाशी संबधित सर्व ई सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. तसेच भविष्यातील ई-बाईक आणि प्रत्येक चौकात सौर उर्जेवरील मोबाइल चार्जिंग पॉईटही उभारले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)