पुणे : हाय प्रोफाईल वेश्‍याव्यवसायाच्या मुख्य सुत्रधारास अटक

पुणे – शहरातील वेश्‍याव्यवसायाच्या मुख्य सूत्रधार कृष्णासिंग यास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. तो मोक्कासह आठ गुन्ह्यांमध्ये वॉंटेड होता. कुष्णासिंग सुरेंद्रसिंग (रा. वसई) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे 24 एजंट शहरात कार्यरत होते.
शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये चालत असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या अनुषंगाने 19 सप्टेंबर 2017 रोजी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी कृष्णासिंग सुरेंद्रसिंग हा त्याच्या साथीदार एजंटासह संघटीतरित्या वेश्‍याव्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यासह 24 साथीदारांविरुध्द मोक्का लावण्यात आला होता. तपासादरम्यान 11 आरोपींना अटक करण्यात आली होती.

मात्र, टोळी प्रमुख कृष्णासिंग वॉन्टेड होता. दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाला तो वाशी महामार्गावरील पुलावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 50 हजाराची रोकड व वेगवेगळ्या कंपन्यांचे फोन, एक वायफाय राऊटर, मारुती स्वीफ्ट कार, कागदपत्रे आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला.

न्यायालयाने त्याला पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम, समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक फौजदार नामदेव शेलार, पोलीस कर्मचारी राजाराम घोगरे, सुनील नाईक, ढोले यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)