पुणे – स्वारगेट ‘ट्रान्सपोर्ट हब’चे शनिवारी भूमिपूजन

पुणे – स्वारगेट येथील नियोजित “मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब’चे भूमीपूजन येत्या शनिवारी (दि. 9) दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.

“पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. “या प्रकल्पासाठी प्रामुख्याने राज्याचा परिवहन विभाग (एमएसआरटीसी), पीएमपीएमएल आणि पुणे महापालिकेच्या जागांची आवश्‍यकता होती. या जागा “मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब’ला मिळाव्यात यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या हबच्या कामासाठी नेहमीच सकारात्मकता आणि तत्परता दाखवली आणि त्याचाच परिणाम म्हणून हे काम लवकर मार्गी लागू शकले आहे. या हबमुळे शहरातील सार्वजनिक सुविधेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व वाहतूक सुविधांचा स्वारगेट येथे समन्वय साधला जाणार आहे. स्थानिक बस, एसटी, मेट्रो आणि वाहतुकीचे खासगी पर्यायही या हबच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार असल्यामुळे प्रवास सोपा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आधीच्या सरकारचा हे ट्रान्सपोर्ट हब “बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर आणण्याचा प्रयत्न होता. परंतु आम्ही त्याला विरोध केला. आता हा प्रकल्प “पीपीपी’ तत्त्वावर होत आहे,’ असेल् मिसाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)