पुणे – स्वारगेट चौकातील कोंडी “वठणीवर’

संग्रहित छायाचित्र

वाहतूक नियोजित, कारवाई सुरूच : कारवाई सुरूच

पुणे – वाहतूक विभागाने सोमवारी केलेल्या धडक कारवाईमुळे इतरवेळी सातत्याने कोंडीत असलेला स्वारगेटचा मुख्य चौक मंगळवारी नियोजित सुुरू होता. ना गर्दी, ना जाम यामुळे दिवसभर वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, बेशिस्तांवर सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू होती.

गेल्या दोन दिवसांपासून स्वारगेट चौकात पोलिसांनी जोरदार कारवाई केली. शंभरपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने बेशिस्त रिक्षाचालक, पीएमपीएल, एसटीसह इतर वाहनचालकांनीही याचा चांगलाच धसका घेतला आहे. यामुळे मंगळवारी या परिसरातून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, यात जवळपास 72 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

स्वारगेट येथील जेधे चौकात वाहनांची वर्दळ असते. त्यातच काही बेशिस्तांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे, असे पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी सांगितले.

दत्तवाडीतील रस्त्यांवर नो पार्किंग
दत्तवाडी विभागातील नाथ पै चौकापासून राजेंद्र नगर लेन कडे जाणाऱ्या तसेच नाथ पै चौकाकडून दत्तवाडीकडे जाताना पिंपळाच्या झाडापासून ते स्टेट बॅंकेसमोरील शौचालयापर्यंत रस्त्यावरतील दोन्ही बाजुस 20 मीटर अंतरावर नो पार्किंग-नो हॉल्ट करण्यात येणार आहे. याबाबत काही उपाय सुचवायचे असल्यास त्यांनी 10 सप्टेंबरपर्यंत वाहतूक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)