कसबा पेठेतील साततोटी कारंजा वस्तीतील घटना
पुणे- महानगरपालिकेच्या स्वच्छतागृहाच्या उघड्या टाकीत पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील कसबा पेठ भागात ही घटना घडली असून, तुषार रामोशी (12) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठ परिसरातल्या साततोटी कारंजा या वस्ती भागात महानगरपालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. गुरुवारी रात्री तुषार स्वच्छतागृहात गेला होता. रात्रीच्या वेळी तुषारला उघडी टाकी न दिसल्याने तोल जाऊन तो टाकीत पडला. दरम्यान, बराच वेळ तुषार घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी त्याला शोधायला सुरूवात केली. त्यांना स्वच्छतागृहाच्या टाकीजवळ तुषारचा पाण्याचा डबा पडलेला दिसला. त्यानंतर वडिलांनी पाण्याच्या टाकीत उतरून शोध घेतला असता, तुषारचा मृतदेह टाकीत सापडला.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry