पुणे स्मार्ट सिटी ऑफलाईन हॅकेथॉनला पुणे विद्यापीठात अभूतपूर्व प्रतिसाद,

६५० हून अधिक प्रस्ताव, शनिवारपासून हॅकॅथॉनला झाली सुरवात
पुणे: पुणे स्मार्ट सिटीने नीती आयओगच्या भागीदारीत पुणे विद्यापीठात प्रथम स्मार्ट सिटी हॅकेथॉन सुरू केली. एसडब्ल्यूएम, हेल्थ, सिटिझन सेफ्टी अँड सिक्युरिटी, डिजिटल कनेक्टिविटी आणि वॉटर सप्लाय या पाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ही हॅकेथॉन लक्ष केंद्रित करीत आहे. त्यात देशातील 3200+ नोंदणी आणि 650+ सबमिशनसह अभूतपूर्व पातळीवर सहभाग नोंदवला गेला.
निवडण्यात आलेले 48 संघ पुढील 36 तासांपेक्षा अधिक वेळ त्यांच्या उपाययोजनांच्या प्रस्तावावर पुणे विद्यापीठात काम करतील. विजेत्या संघांना पंचांनी निवडलेल्या दोन फेऱ्यानंतर 30 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात रविवारी सन्मानित करण्यात येईल. या विषयावर टिप्पणी करताना, सीकेओ, पीएससीडीसीएल श्री. मनोजित बोस म्हणाले, "या हॅकेथॉननेविविध स्टार्टअप्समध्ये महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली आहे आणि क्राऊड सोर्सिंगमधून उपाययोजना मिळवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तसेच नागरिकांना सह-निर्मितीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले की, पुणे स्मार्ट सिटीमध्ये नवकल्पना आणि नवनिर्मितीची संस्कृती रुजवण्याचा आमचा मानस आहे. आणि ही हॅकेथॉन स्पर्धा म्हणजे त्या दिशेने जाण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. तंत्रज्ञानाचा नाविन्यूपर्ण वापर करून स्मार्ट सिटीसाठी चांगल्या उपाययोजना या हॅकेथॉनमधून समोर येतील अशी आशा आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)