पुण्याला “सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया’ पुरस्कार

पुणेकरांच्या वतीने डॉ. राजेंद्र जगताप, मनोजित बोस यांनी स्वीकारला

पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीएससीडीसीएल) यंदाचा बिझनेस “वर्ल्ड सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी इंडिया’ पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात “पीएससीडीसीएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी पुणेकरांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

सहावी स्मार्ट सिटी परिषद आणि पुरस्कार सोहळ्यात हिमाचल प्रदेशच्या नगरविकास मंत्री शर्वीन चौधरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

पुणे स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. यामुळे मुल्यवर्धित तंत्रज्ञानाच्या साह्याने स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा उत्साह द्विगुणित झाला आहे, असे डॉ. जगताप म्हणाले.

यावेळी आयोजित “नागरी आधुनिकीकरण आणि सुकर जीवन यातील नाविन्यूपर्ण उपाययोजना’ या विषयावरील चर्चासत्राचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जगताप सहभागी झाले होते.

पुणे स्मार्ट सिटीने हाती घेतलेले अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प आकार घेऊ लागले आहेत. एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे पोलीस, वाहतूक, अग्निशमन अशा शक्‍य तितक्‍या विभागांना एकमेकांशी जोडता येऊ शकते. तसेच रस्त्यांसाठी अधिक बिनचूक तरतुदी करण्यासाठी रस्त्यांच्या डेटाबेसचा उपयोग होतो, असे डॉ. जगताप यांनी सांगितले. शहरातील विविध बाबींचे 70 ते 80 टक्‍के जिओटॅगिंग करण्याबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. मुख्य ज्ञान अधिकारी बोस यांनी पुणे आयडिया फॅक्‍टरी फाउंडेशनबद्दल यावेळी विशेष सादरीकरण केले. तसेच, “तंत्रज्ञानाच्या आधारे बदलणारे शहरी दळणवळण’ या विषयावरील चर्चासत्राचे त्यांनी सूत्रसंचलन केले.

केवळ तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा नव्हे तर नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम पुणे स्मार्ट सिटी करत आहे. त्याची दखल वेगवेगळ्या पातळ्यांवर घेतली जात असल्याचे बोस म्हणाले.

स्थानिक विकास प्रकल्पांबाबत त्यांना माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या वतीने नजीकच्या काळात होणाऱ्या विकासकामांबद्दल जगताप यांनी चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)