पुणे: स्मार्ट सिटीच्या विकासात पुणेकरांचा मोलाचा सहभाग

महापौर टिळक : स्मार्ट लिव्हेबल अँड रेझिलिअंट सिटी कॉन्क्‍लेव परिषद

पुणे- स्मार्ट सिटी विकसित करण्यात नागरिकांची भूमिका व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. या विकासात सजग पुणेकर नागरिकांचा सहभाग घेतला जात आहे आणि तो महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या विकासासाठी वाहतूक नियंत्रण हा एक प्राधान्याचा आणि महत्त्वाचा घटक आहे. त्यात स्मार्ट पार्किंगचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पुणे प्रयत्नशील आहे. असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटी मिशनच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने स्मार्ट लिव्हेबल अँड रेझिलिअंट सिटी कॉन्क्‍लेव (स्मार्ट राहण्यायोग्य व संवेदनक्षम शहर) या विषयावरील परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या.

या परिषदेत विविध स्मार्ट सिटींमध्ये राबवण्यात येणाऱ्या नव्या संकल्पना आणि स्मार्ट सिटीचे प्रकल्प यशस्वीपणे राबवणारे धोरणकर्ते, तसेच अधिकारी यांचे अनुभव आणि विचारांचे आदानप्रदान यावेळी करण्यात आले. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आपली मते, दृष्टिकोन मांडले, तसेच त्यावर विचारविनिमय करण्यात आला. याद्वारे एका शहरातील उत्कृष्ट प्रकल्पांचे अनुकरण इतर शहरांमध्ये करण्यासाठी मदत होणार आहे, असे परिषदेत सहभागी झालेल्या इतर स्मार्ट सिटींमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या एक दिवसिय परिषदेमध्ये विचारप्रवर्तक, धोरणकर्ते, उद्योग तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय संस्था आणि वकिलाती, सार्वजनिक क्षेत्रातील अग्रेसर संस्था आणि स्मार्ट सिटीशी संबंधित खाजगी आणि सरकारी, तसेच शैक्षणिक व इतर क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)