पुणे स्थानकाचा पाणी प्रश्‍न मिटणार

घोरपडीतून पाईपलाईनव्दारे रोज 3 लाख लीटर पाणी

पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर दैनंदिन वापरासाठीचा भेडसावणारा पाणी प्रश्‍न मार्गी लागला आहे. घोरपडी रेल्वे हद्दीत असलेल्या विहिरीतून दररोज 3 लाख लिटर पाणी पुणे स्थानकावर आणण्यात येणार आहे. यामुळे प्रशासनाला पाण्यासाठी विकत टॅंकर घेण्याची गरज पडणार नाही, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे स्थानकावर रोज ये-जा करणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. या व्यतिरीक्त नागरिकांना पाणी पिण्यासाठी, कॅन्टीन, स्वच्छतागृहे यांच्या दैनंदिन वापरासाठीही लागते. पाण्याचा वापर जास्त असल्याने मागील काही दिवसांपासून रेल्वेला पाणी प्रश्‍न भेडसावत होता. यामुळे प्रशासन टॅकरच्या सहाय्याने विकत पाणी घेत होते. मात्र, घोरपडी परिसरात रेल्वे हद्दीत मोठी विहीर असून तिची तब्बल 10 लाख लिटर पाणी क्षमता आहे. सध्या विहिरीला मुबलक पाणी असून याच विहिरीतून पाईपलाईनच्या सहाय्याने पुणे स्थानकावर पाणी आणले जाणार आहे. यासाठी आवश्‍यक ते काम पूर्ण झाले असून येत्या पंधरा दिवसांत स्थानकावर प्रत्यक्ष पाणी पोहोचवले जाईल, असेही देऊस्कर यांनी सांगितले.

लोकल डब्यामध्ये पाणी लागत नसले तरी लांब पल्ल्यांच्या गाडींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लागते. एका डब्यासाठी जवळपास दोन हजार लीटर पाण्याचा वापर होतो. यामुळे रेल्वेला अनेकदा विकत पाणी घ्यावे लागत होते. आता हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)