पुणे स्टेशनवर उभारणार 100 फुटांचा ध्वजस्तंभ

पुणे – पुणे रेल्वे स्थानकावर तब्बल शंभर फुट उंच अशा भव्य ध्वजस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी स्तंभ उभारण्यात आला आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकवून उद्‌घाटन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाने मिळून अ-वर्गाअंतर्गत येणाऱ्या सुमारे 75 रेल्वे स्थानकांवर ध्वजस्तंभाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार स्थानकांवर ध्वजस्तंभाची उभारण्यात येत असून पुणे स्थानकावरील काम पूर्ण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा ध्वजस्तंभ 100 फुटी असून स्थानकाच्या दर्शनी भागात वाहनतळाशेजारी त्याची उभारणी करण्यात आली आहे. या उभारणीसाठी सुमारे 15 लाख रुपयांचा खर्च आला आहे. शहरातील कात्रज तलावातील ध्वजस्तंभ सर्वात मोठा असून यानंतर शनिवारवाड्यासमोरही भव्यदिव्य असा ध्वजस्तंभ आहे. यानंतर आता आणखी एक मोठा ध्वजस्तंभ स्टेशनवर उभारण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)