पुणे स्टेशनवर आजपासून बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित

पुणे – प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे आणि ते फेकल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यासाठी देशभरातील अनेक रेल्वे स्टेशनवर बॉटल क्रशिंग मशीन सुरू करण्यात आले आहे. पुणे स्टेशनवर देखील हे मशीन उपलब्ध करुन देण्यात आले असून स्वातंत्र्य दिनापासून ते कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

स्टेशन परिसरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने याठिकाणी जमा होणाऱ्या प्लॅस्टिकचे प्रमाणही जास्त आहे. रेल्वेतील प्रवाशांकडून सर्रासपणे खिडकीबाहेर बॉटल भिरकावण्यात येतात. त्यामुळे पशु-पक्ष्यांच्या जीविताला देखील धोका उद्भवतो. या प्रकाराला अटकाव बसावा आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा या उद्देशाने देशभरातील विविध स्थानकावर बॉटल क्रशिंग मशीन सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता पुणे स्थानकावर देखील ते बसवण्यात येणार आहे. आज 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर प्रशासनाकडून ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. यानंतर सर्वांना ते वापरासाठी उपलब्ध असणार आहे. प्रवाशांनी आपल्याजवळील प्लॅस्टिक बॉटल मशीनमध्ये टाकायची असून त्याचे बारीक चुरे होतील. यामुळे त्याचा पुनर्वापर देखील करण्यात येऊ शकतो. दरम्यान, पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीकोनातून पुणे स्थानकाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)