पुणे स्टेशनवरील सरकते जिने फेब्रुवारीत कार्यान्वित

पुणे – पुणे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावरील विविध ठिकाणी एकूण 5 सरकते जिने (एस्केलेटर) बसवण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात (फेब्रुवारी) पाचही जिन्यांचे काम पूर्ण करून ते कार्यान्वित केले जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी राजा बहादूर मिल रोड येथील डीआरएम ऑफिस ते प्लॅटफॉर्म एक दरम्यान करण्यात आलेल्या नव्या पादचारी पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले. यानंतर अनेक दिवस सरकत्या जिन्याचे काम रखडले होते. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची परवड होत असून त्यांना पुलावर चढ-उतर करावे लागत आहे. या पार्श्‍वभूमिवर रेल्वे प्रशासनाकडून सरकत्या जिन्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नव्याने बसविण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांपैकी ताडीवाला रोड येथे 2, दत्त मंदिर येथे 2 आणि प्लॅटफॉर्म 2 आणि 3 येथे मिळून 1 असे एकूण 5 जिने बसवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. सरकते जिने कार्यान्वित झाल्यास प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)