पुणे – सोशल मीडियाद्वारे लावणार बेशिस्तांना चाप

 

– वाहतूक पोलीस आता ट्‌विटरवर : व्हॉट्‌स ऍपद्वारेही कार्यवाही
– वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देणार अपडेट्‌स

पुणे – शहराची वाहतूक व्यवस्थाही “स्मार्ट’ असावी, यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत. शहरभर यापूर्वीच सीसीटीव्हीचे जाळे पसरवण्यात आले असून नागरिकांना तक्रारीसाठी व्हॉट्‌स ऍप क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यातच पुढचे पाऊल टाकत वाहतूक पोलिसांनी स्वतःचे अधिकृत ट्‌विटर हॅंडल सुरू केले आहे. याचा वापर करून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा तसेच बेशिस्तांना चाप लावण्यावर भर देण्यात येत आहे.

शहराची वाहतूक समस्या भीषण झाली आहे. रस्त्याच्या कडेला, नो पार्किंग परिसरात लावलेली वाहने, बेशिस्त वाहनचालकांमुळे होणारे अपघात यामुळे कोंडीत भर पडते. वाहतूक पोलीस यावर उपाययोजना करते, मात्र त्याला फारसे यश मिळत नाही. त्यावर आता पुणे पोलिसांनी यासाठी फेसबुक, व्हॉट्‌स अूप अशा सोशल माध्यमांचा वापर करत आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आणि कार्यवाहीसाठी नागरिकांचाही त्यात सहभाग असावा, यासाठी यापुर्वीच नागरिकांसाठी व्हॉट्‌स ऍप तक्रार क्रमांक (8411-800-100) सुरू करण्यात आला आहे.
——————————-
नागरिकांनी तक्रार करावी
सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतुकीविषयी माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी यापूर्वी पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनच वाहतुकीबद्दल माहिती दिली जात होती. मात्र, 15 ऑगस्टपासून वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र अधिकृत @Punecitytraffic हे ट्‌विटर हॅंडल सुुरू करण्यात आले आहे. काही वेळा एखादा रस्ता जाम होतो. संबंधित ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्यास कोंडी अधिकच वाढते. यामुळे अशा प्रकारची तक्रार नागरिकांनी व्हॉट्‌स ऍप, ट्‌विटवरुन केल्यास ही बाब लक्षात येईल. तसेच हा संदेशजवळील वाहतूक विभागाला सांगून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली जाणार आहे.
———————–
दहा दिवसांत 40 हजार केसेस
वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहीम जोरदार मोहीम सुरू आहे. दि. 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी जॅमर, रॅश ड्रायव्हिंग, सायलेन्सरमध्ये बदल, अल्पवयीन वाहनचालक, विनापरवाना वाहन चालवणे अशा एकूण 40 हजार केसेसमध्ये 91 लाखांचा दंड वसूल केला आहे.
———————–
व्हॉट्‌स ऍप, ट्‌विटरवरुन नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कार्यवाही केली जात आहे. यासाठी एक टीम कार्यरत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वांनी नियम पाळल्यास वाहतुकीस शिस्त लागणार आहे. गेल्या दहा दिवसांत 77 अल्पवयीनांवर कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देणे धोकादायक असून पालकांना बोलावून ही बाब सांगण्यात येणार आहे. तसेच बेशिस्तांकडून दंड वसूल करणे हे ध्येय नसून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– तेजस्वी सातपुते, वाहतूक पोलीस उपायुक्त, पुणे
———————-
व्हॉट्‌स ऍप नंबर – 8411-800-100
ट्विटर हॅंन्डल – Punecitytrafficpolice@Punecitytraffic
——————-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)