पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

वरवंड- पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खडकी (ता.दौंड) येथील आनंद ढाब्या समोर ट्रकला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आज, पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात बस मधील बाळू रघुनाथ सूर्यवंशी (वय 32, रा.निदुरमोर, ता.निलंगा, जि.लातूर) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पावले ट्रॅव्हल बस (क्र. एमएच 12 एचबी 9495) व ट्रक (क्र.एपी 28 टीसी 1279) ही दोन्ही वाहने पुणे बाजूकडे जात असताना बसचालक मदन लक्ष्मण जोगदंड याचे नियंत्रण सुटल्याने ट्रकवर जावून आदळला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून बस चालका विरुद्ध दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील किरकोळ जखमींवर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार पंडित मांजरे यांनी दिली, अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)