पुणे-सोलापूर महामार्गावर तुरळक वाहतूक

लोणी काळभोर- मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला नागरिकांनी आज (दि. 9) दिवसभर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. मागच्या वेळी तरुणांनी नागरिकांना दुकाने बंद करा म्हणून आवाहन केले होते. आज मात्र एकाही तरुणाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले नव्हते. मात्र, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे आज दिवसभर लोणी काळभोर व कदमवाक वस्ती ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व व्यवहार बंद होते. पुणे-सोलापूर महामार्ग सुरळीतपणे सुरू होता; परंतु महामार्गावर एसटी, ट्रक अशा कुठल्याही मोठ्या गाड्या सुरू नव्हत्या. पीएमपीची बससेवाही बंद होती. खासगी वाहनेही अत्यंत तुरळक प्रमाणात रस्त्यावर दिसत होत्या, त्यामुळे महामार्ग मोकळा होता. परिसरातील शाळा, महाविद्यालयेही बंद होती. बंद अगोदरच जाहीर केलेला असल्याने नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळले. परिणामी वाहतूक साधनांअभावी होणारा त्रास कुणालाच झाला नाही. वैद्यकीय सेवा सेवा सुरू होत्या.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. एक पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, 35 कर्मचारी, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या, गृहरक्षक दलाचे 15 जवान, पोलीस मित्र तसेच सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असा बंदोबस्त होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)