पुणे-सोलापूर “कचरा’ महामार्ग

दुभाजकामध्ये प्लॅस्टीक, बाटल्यांचा खच

डिकसळ- पुणे-सोलापूर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. तसेच, याच मार्गालगत ग्रामपंचायतीने कचरा कुंड्या मांडल्या आहेत, त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर भिगवण बसस्थानक ते मदनवाडी पुलापर्यंत महामार्गाच्या मध्यभागी असण्याऱ्या दुभाजकामधील झाडांवर मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने प्रवाशांना तसेच वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. तसेच, जवळच ग्रामपंचायतीने भर महामार्गालगत कचरा कुंड्या मांडल्या आहेत.
रात्रीच्या वेळी प्लॅस्टीकचे कागद चमकत असल्याने वाहन चालकांचे लक्ष विचलीत होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्यातील बाटल्या रस्त्यावर येवून त्यावरून वाहने घसरूनही छोटे-मोठे अपघात होत आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे डास, माशा व दुर्गंधीचा त्रास स्थानिक नागरिकांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग, भिगवण ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करूनही याबाबत कारवाई होत नसल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)