पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस महिनाभर रद्द

पुणे – सोलापूर विभागातील भिगवण ते वडशिंगे दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामाकरीता महिनाभर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे 12169/12170 अप व डाऊन पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्‍स्प्रेस दि. 3 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान महिनाभर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मेगाब्लॉकच्या महिनाभराच्या कालावधीत या मार्गावरील लोहमार्गाचे काम केले जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच हे काम केले जात असून यामुळे रेल्वे रद्द करावी लागली, असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील या मार्गावर वेळोवेळी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे ही कामे लवकरात लवकर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यावर मनुष्यबळाची तूट असल्याने कामे रखडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, महिनाभर गाडी रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असून त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)