पुणे – सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडून सोसायटीतील अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने अश्‍लील कृत्य केल्याच्या धक्‍क्‍कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी सोसायटीच्या सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षारक्षक सेवक महादेव तरंगे (38, रा. हडपसर) याला हडपसर पोलिसांनी अटक केली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरंगे हा फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. दरम्यान, फिर्यादी यांची 12 वर्षीय मुलगी सोसायटीतून लिफ्टने खाली येत होती. यावेळी आरोपी तरंगे याने चार ते पाचवेळा लिफ्ट खालीवर करून जबरदस्तीने तिच्याशी अश्‍लील कृत्य केले.

अल्पवयीन मुलीने तातडीने हा प्रकार घरी सांगितला. यामुळे ही बाब उघडकीस आली. यानंतर पोलिसांनी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केले. दरम्यान, पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनदेखील नागरिक सुरक्षारक्षकांची चारित्र्यपडताळणी न करता त्यांना कामावर ठेवतात. यामुळे असे प्रकार घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)