“पुणे सी’ संघाला विजेतेपद 

21 वी ऑल इंडिया लॉयर्स क्रिकेट स्पर्धा 
 
पुणे – पुणे सी संघाने आंध्रप्रदेश व तेलंगना संघाचा पराभव करताना आंध्र प्रदेश व तेलंगना उच्च न्यायालय ऍडव्होकेट क्रिकेट असोसिएशन यांच्या तर्फे आयोजीत 21 वी ऑल इंडिया लॉयर्स क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना आंध्रप्रदेश व तेलंगना संघाने निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावांची मजल मारली. यावेळी पुणे सी संघाकडून ऍड. उमेश चांडोलेने 24 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केल्या तर ऍड. विवेक देशमुखने 27 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद केले. यावेळी पुणे सी संघ विजयासाठी 134 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. यावेळी पुणे सी संघाने हे आव्हान केवळ 18.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 139 धावा करत पुर्ण केले. यावेळी “पुणे सी’च्या ऍड. असद शेखने नाबाद 71 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)