पुणे : सिझन, अॅमेनोरा मॉलला महापालिकेचा दणका

अनधिकृत जाहिरात फलक आकाशचिन्ह विभागाने काढले


आणखी 22 मॉलधारकांना पालिकेची नोटीस

पुणे – अनधिकृत जाहिराती लावल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने सिझन मॉल आणि अॅमेनोरा सिटी मॉलवर कारवाई करत या जाहिराती जमीनदोस्त केल्या आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू असल्याची माहिती विभागप्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली. दरम्यान, शहरातील 22 मॉलधारकांना या प्रकरणी नोटीस बजाविण्यात आली आहे.

शहरातील मॉलधारकांना त्यांच्या दर्शनिय भागात 3 फूट उंचीची तसेच दर्शनिय भागाच्या लांबीएवढी जाहिरात मोफत करता येते. मात्र, जवळपास सर्वच मॉलचालकांनी या नियमांचे उल्लंघन करत अनेक मोठ्या जाहिराती लावल्या आहेत. यासाठी प्रत्यक्षात महापालिकेस प्रतिचौरस फूट 222 रूपये भरून या नियमावलीनुसार, मान्यता घेणे आवश्‍यक आहे. मात्र, मॉलचालकांनी महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली दाखविण्यात येत होती.

अखेर प्रशासनाने मॉलवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नेमलेल्या भरारी पथकाने सिझन मॉल आणि ऍमेनोरा सिटीतील मॉलबाहेरील अनधिकृत जाहिी हटविल्याचे दौंडकर म्हणाले. दरम्यान, या दोन्ही मॉलने उभारलेल्या जाहिरातींच्या आकाराचे मोजमाप सुरू असून त्यानुसार, दंड वसूल केला जाणार आहे.

10 कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित
दरम्यान, शहरातील 22 मॉलच्या बाहेर अनधिक़ृत जाहिराती असून 31 मार्च अखेरपर्यंत या सर्व मॉलवर कारवाई केली जाणार आहे. या सर्व मॉलधारकांनी लावलेल्या जाहिराती पाहता, त्यातून महापालिकेस सुमारे 10 कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. मात्र, बेकायदेशीरपणे जाहिराती उभारून महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे दौंडकर म्हणाले. तसेच त्याबाबतचे नियोजनही तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)